भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको गुंतूम मायाजाळी । काळ उभा हा जवळीं

nako guntum mayajali | kal ubha ha javalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नको गुंतूम मायाजाळी । काळ उभा हा जवळीं ॥१॥ नाहीं तुजलागीं तत्त्वतां । सोडविणार मातापिता ॥२॥ स्त्रिया पुत्र बंदीजन । करिती तुजलागीं बंधन ॥३॥ धनवित्त कुळें । सोडितील अमंगळें ॥४॥ एका जनार्दनीं मन । ठेवी गुरुपायीं बांधोन ॥५॥