भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको कर्म धर्म वार्ता । सुखें करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणें तुटे तुमची

nako karma dharma varta | sukhen kara harikatha | bhavajanmavyatha | yenen tute tumachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नको कर्म धर्म वार्ता । सुखें करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणें तुटे तुमची ॥१॥ सोपें साधनाचें सार । वाचे नरहरी उच्चारी । भयें चुके येरझार । चौर्‍यांशींची ॥२॥ नका वेदशास्त्र पाठ । नामें धरा नीट वाट । पंढरी हे पेठ । भूवैकुंठ महीवरी ॥३॥ म्हणोनि करा करा लाहो । वाचे रामनाम गावो । एका जनार्दनी भावो । दृढ ठेवा विठ्ठलीं ॥४॥