भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको आणिकांच्या पडुं हावभरी । वांयां रानभरी कां रे रहाशीं

nako anikanchya padun havabhari | vanyan ranabhari kan re rahashin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नको आणिकांच्या पडुं हावभरी । वांयां रानभरी कां रे रहाशीं ॥१॥ चुकवी पतन उच्चारीं तुं नाम । आणिक नको धाम यापरतें ॥२॥ वेगळें वेगळें चहूं वाचांपरतें आहे । साहांचे तें पाहें न चले कांहीं ॥३॥ अठरांची मती कुंठीत राहिली । एका जनार्दनीं माऊली विठ्ठल देखा ॥४॥