भजनी मालिका

भजने

धन वित्त आशा धरुनी स्मरती । तेही मुक्त होती विठ्ठलनामें ॥१॥ प्रपंच परमार्थ धरुनियां हाव । गाती विठ्ठल देव आवडीनें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धनदारापुत्र अपत्यें म्हणसी माझें । परीं हे काळाचें खाजें बापा ॥१॥ गंगेलागीं पूर अवचित आला । लोटोनियां गेला मागुती जैसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धनमानबळें नाठविसी देवा । मृत्युकाळीं तेव्हां कोण आहे ॥१॥ यमाचे यमदंड बैसतील माथां । तेव्हां तुज रक्षिता कोण आहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धना जाट घरीं नित्य उभा हरी । एकनाथा घरीं धो-तरें धूत ॥१॥ कबीराची पांजणी करी चक्रपाणी । जनीसवें शेणी वेचूं लागे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य अलंकापुर धन्य सिद्धेश्वर । धन्य ते तरुवर पशुपक्षी ॥१॥ धन्य इंद्रायणी धन्य भागीरथी। तेथे स्नान जे करिती धन्य जन्म ॥२॥

रचनाकार: संत सेना

धन्य आज दिन संतदरुशनाचा । अनंत जन्मांचा शीण गेला ॥१॥ मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्याचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें । साहित्य स्वआंगें करितसे ॥१॥ नाशिवंत देह जाईल कीं अंतीं । नीचाची संगति कोण काज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य आळंकापुरी शिवपीठ शिवाचें । अगस्ति ऋषीचेम पूर्वस्थळ ॥१॥ त्रिवर्गीं म्हणितलें जाताम जातां हरी । आम्हां कौंडण्यपुरीं आज्ञा द्यावी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥ धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य कर्‍हेचे पाठारीं । इंद्रनीळ पर्वत महागिरी । जैसें आळंकापुरीं । तैसें पुण्यक्षेत्र हें ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

धन्य काशीपुरी धन्य काशीपुरी । जेथें वास करी विश्वनाथ ॥१॥ तयाच्या दर्शनें प्राणी मुक्त होय । चारी मुक्ती पायां लागताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ