भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य काळ आजिचा दिवस । हरिचे दास भेटले

dhanya kal ajicha divas | hariche das bhetale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धन्य काळ आजिचा दिवस । हरिचे दास भेटले ॥१॥ दंडवत घालीन पायां । करीन काया कुरवंडी ॥२॥ पाप ताप दैन्य गेलें । येथुनी पाउलें देखतां ॥३॥ निळा म्हणे पावलों फळ । केलिया निर्मळ सुकृतातें ॥४॥