भजनी मालिका

भजने

त्रिभुवनींचा दीप प्रकाशु देखिला । हृदयस्थ पाहिला जनार्दनं ॥१॥ दीपाची ती वाती वातीचा प्रकाश । कळिकामय दीप देहीं दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिभुवनींचें जीवन कीं अमरांचें ठेवणें । कैसें भाग्य लहाणे लक्ष्मी़चे ॥१॥ धन्य गौळियांचें धन्य धन्य जिणें । ज्या घरीं खेवणें परब्रह्म ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥ नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविले॥१॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख तो गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्रिविधतापें प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृतें ॥१॥ अमृतापरीस तुझी कथा अधिक । सांगतसे ऐक देव- राया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥ आणिके सुख नाही कोठें । पाहतां नेटें कोटि जन्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही । वर्तती गुणीं आपुलाल्या ॥१॥ जैसी क्रिया तैसें फळ । हें तों सकळ जाणती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्रिवेणीसंगमी बुडती बहुत । नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥ ज्यांचे कर्म जैसें भोगिती ते फळ । गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्रेतायुगीं ख्याती करोनियां थोर । वधिले असूर रावणादी ॥१॥ कोण्या हेतुस्तव पुन्हा आगमन । सांगा कृपा करून दासालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥ पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥ आणिक साधनें आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

त्रैलोक्या माझारी एक विठाबाई सुंदरी हो । पुंडलिका कारणें तिष्ठत भीमातीरीं हो ॥१॥ उदो बोला उदो बोला विठाबाई माउलीचा हो ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव