भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी

triveni sangami nana tirthe bhrami

त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरि तें व्यर्थ ॥१॥ नामासि विन्मुख तो नर पापीया । हरिविण धावया नपवे कोणी ॥२॥ पुराणप्रसिध्दि बोलिले वाल्मीक । नामें तिन्ही लोक उध्दरती ॥३॥ ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुध्द ॥४॥