भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल

trailokyacha mugutamani | chakrapani shriviththla

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रैलोक्याचा मुगुटमणी । चक्रपाणी श्रीविठ्ठ्ल ॥१॥ तया गावें वेळोवेळी । आणीक चाळा विसरुनी ॥२॥ संसाराचें नुरे कोड । पुरे चाड अंतरीची ॥३॥ एका जनार्दनीं शरण । देव स्वयें तिष्ठे आपण ॥४॥