भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रेतायुगीं ख्याती करोनियां थोर । वधिले असूर रावणादी

tretayugin khyati karoniyan thor | vadhile asur ravanadi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
त्रेतायुगीं ख्याती करोनियां थोर । वधिले असूर रावणादी ॥१॥ कोण्या हेतुस्तव पुन्हा आगमन । सांगा कृपा करून दासालागीं ॥२॥ ऐकोनियां वचन बोले सर्वेश्वर । द्बापारीं अवतार आठवा हा ॥३॥ तुझे हे भेटीस्त व रूप हेम धरिलें । दावां तें वहिलें कपी ह्मणे ॥४॥ कृष्णलीला पाहूं हेत आहे चित्ता । दावीं सीताकांता दीनालागीं ॥५॥ चतुर्भुज रूप दाविलें प्रगट । शिरीं मोरमुगुट शोभतसे ॥६॥ गुंजाहार गळं वैजयंती माळा । कांसेसी पिंवळा पीतांबर ॥७॥ नवलक्ष गाई गोपही तितुके । खेळती कौतुकें करोनियां ॥८॥ नामा म्हणे तेव्हां स्तुति ते करीत । न कळें तुझा अंत ब्रह्मादिकां ॥९॥