भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनीचें सुख एकतत्त्व विठ्ठल

tribhuvanichen sukh ekatattva viththal

त्रिभुवनीचें सुख एकतत्त्व विठ्ठल । नलगे आम्हां मोल उच्चारिता ॥१॥ विठ्ठल उघडा मंत्र कळिकाळा त्रास । घालुनियां कांस जपों आधीं ॥२॥ सत्त्वर सत्त्वाचे जपती नामावळी । नित्यता आंघोळी घडे रया ॥३॥ बापरखुमादेविवरु जिव्हाळा ह्रदयीं । जीवाचा जीव ठायीं एकेपाती ॥४॥