भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें

trailokya pilatan ubagala nahin | amachen tya kai ase ojhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्रैलोक्य पिळतां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥ पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥ तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥