भजनी मालिका

भजने

अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥ मग कैचें हरीचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अर्चन विष्णूचें नाहीं पूजन । तये गांवींचे अनामिक जन । भूतप्रेताचें करिती भजन । तयासि दंडन करी यम ॥१॥ ह-रीचे वांचोनि सुकृत करी । तया नांव पुण्य ठेविजे जरी । तुटोनि पडो त्यांची वैखरी । अंतीं महा अघोरीं वास तया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अर्चूनियां पुंडलिका । विश्वाव्यापका राहविलें ॥१॥ थोर उपकार केला लोकां । भक्ता भविकां तारियेलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनि कर ठेउनी कंटीं उभा येथें ॥१॥ धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणोनि कर जघन ठेउनी उभा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥ भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥ भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

अर्थ जे काढिती उपनिषदांमाजीं सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥ भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हां उघड समाधी नाममात्रें ॥१॥ हेंचि निरुपण उद्धवा श्रीकृष्ण । सांगतसे खुन जीवींची ते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अर्थेविण पाठ कासया करावें । व्यर्थ कां मरावें घोकुनियां ।। घोकुनियां काय वेगीं अर्थ पाहें । अर्थरूप राहे होउनियां ।।

रचनाकार: संत रामदास

अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा ॥१॥ संतसंग देई संतसंग देई । आणिक प्रवाही घालुं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष ॥१॥ कान्होबा तुझें कोडें । तुजपुढें केलें उघडें । सांगतां वेद जाहले वेडे रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥ भली चंग वावडी । दादांनों भली चंग वावडी ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ