भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्चन विष्णूचें नाहीं पूजन । तये गांवींचे अनामिक जन । भूतप्रेताचें करिती भजन । तयासि दंडन करी यम

archan vishnuchen nahin pujan | taye ganvinche anamik jan | bhutapretachen kariti bhajan | tayasi dandan kari yam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अर्चन विष्णूचें नाहीं पूजन । तये गांवींचे अनामिक जन । भूतप्रेताचें करिती भजन । तयासि दंडन करी यम ॥१॥ ह-रीचे वांचोनि सुकृत करी । तया नांव पुण्य ठेविजे जरी । तुटोनि पडो त्यांची वैखरी । अंतीं महा अघोरीं वास तया ॥२॥ समारंभ करिती आणिक देवाचा । ह्मणती येणें विष्णु तृप्त होय साचा । धिग्‍ धिग्‍ आचार जळो त्यांचा । वांयांवीण वाचा विटाळली ॥३॥ पहा हो नवही द्बारें एकचि देहीं । रसस्वाद कान देतील कांहीं । जयाचा मान तयाच्या ठायीं । येतसे पाहीं सेवितां ॥४॥ जो देवदेवतां शिरोमणि । असुर रुळती जयाच्या चरणीं । तो सांडिती चकपाणी । भजना हातीं होईल तुझिया ॥५॥ विष्णुदास नामा विनवी जगा । अझूनि तरी हरीसि शरण रिघा । जे जे अपराध केले असतील मागा । ते ते नेईल भंगा स्वामि माझा ॥६॥