भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्थ अवघेचि याचे हातीं । जया देऊं जे बोलती

artha avaghechi yache hatin | jaya deun je bolati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अर्थ अवघेचि याचे हातीं । जया देऊं जे बोलती ॥१॥ तों ते तात्काळचि पावले । जगामाजी धन्य झाले ॥२॥ नाहींचि वेळ काळ गुंती । देतां रंक थोर नेणती ॥३॥ निळा म्हणे अवलोकनें । तोडिती भवांचीं बंधनें ॥४॥