भजनी मालिका
← भजनांकडे परत

अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी

alaksha keli vavadi | lakshacha dor paravadi | udaviti bara chauda gadi | bharali ti gagani udi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥ भली चंग वावडी । दादांनों भली चंग वावडी ॥धृ॥ औट हात सोडोनी दोरा । मध्यें कामटी लाविल्या बारा । आत्मास्थितीच्या चंग उबारा । वावडी उडती अंबरा ॥२॥ साहा चार मिळवोनी गडी । अठराजण सोडिती वावडी । एका जनार्दनीं त्यांची जोडी । जनार्दनाचे पायी गोडी ॥३॥ _____________________________________________________ एकीबेकी