भजनी मालिका

भजने

गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभुक ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं । गुरुतें न विसंबे ध्यानीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुरूच्या वचनें होईल पैं ज्ञान । न कळे प्रेम खूण विठोबाची ॥१॥ वेदीं हें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैस प्रेम भाव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥१॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गृहस्थ बैसला ओसरीवरी । गृहस्वाभिणी स्वयंपाक करी । तंव मार्गस्थ ब्राह्मण आला द्वारीं । अन्न द्यावें स्वामिया ॥१॥ पडली कुर्‍हाड कपाळी । रागें सूप चाटू आफळीं । जळत काष्टातें हातीं कवळी । जैसी आसाळी गर्जतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गेला आपुल्या गृहाप्रती । बाळ तो निद्रा न करी रात्रीं । क्षुधा लागलीसे बहुती । मागे दूधभात जेवाया ॥१॥ पुढें ती करड्या वांटुनी । काढिले शुभ्रपाणी । येरें टाकिलें थुंकोनी । म्हणे माते कालीचें नव्हे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥१॥ आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥१॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गेला परमहंस परिवारासहित । कोल्हाळ करिती मायबहिणी ॥१॥ काय हे नगरी पांचही तराळ । निद्नेनें भ्रमले व्याकुळ झाले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया ।। दोहींमध्यें सांपडलें । मीच ब्रह्मसें कल्पिलें ।।

रचनाकार: संत रामदास

गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥ हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥ वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गेले पळाले दिवस रोज । काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥ सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गेलें वेंचोनियां वय याचिपरी । चिंता महापुरीं वाहवलों ॥१॥ धरियेला होता तो विश्वास मानसीं । येणें काळें त्यासीं क्षय आला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा