भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभुक

gurusmaran karitan dekh | smaranen visare tahanabhuk

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभुक ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं । गुरुतें न विसंबे ध्यानीं मनीं ॥२॥ गुरुसेवेची आवडी । सेवा करी चढोवोढी ॥३॥ गुरुचरणाची गोडी । एका जनार्दनी पायीं दडीं ॥४॥