भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया

gela svarupachya thayan | tikade brahma ikade maya

रचनाकार: संत रामदास · अभंग
गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया ।। दोहींमध्यें सांपडलें । मीच ब्रह्मसें कल्पिलें ।। ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपल ।। तिकडे वस्तु निराकार । इकडे मायेचा विस्तार ।। पुढे ब्रह्म मागें माया । मध्ये संदेहाची काया ।। रामीरामदास म्हणे । इतुकें मनाचें करणें ।।