भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना

geliya vrundavana tethen dekhila kanha | sanvagadiya maji ubha dhyan lagalen mana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा । संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥ हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय । गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥ त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें । सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरें ॥३॥ सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा । कौस्तुभा तळवटीं वैजयंती शोभे गळां ॥४॥ सांडुनी मेघराजु कटिसूत्नीं तळपे विजू । भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥ सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज । अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिकां सहज ॥६॥ वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू । भेदली हरिचरणीं पायीं मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥ त्याचें पायींची नेपुरें वाजती वो गंभीरें । लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरें ॥८॥ आणिक एक नवल कैसें स्वर्गीं देव झाले पिसे । ब्रम्हादिक उच्छिष्ठालागीं देखा जळीं झाले मासें ॥९॥ आणिक एक नवल परी करीं घेऊनि शिदोरी । सवंगडया वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥