भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं

gele digambar ishvar vibhuti | rahilya tya kirti jagamajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥ वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥ सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेचि साधन निवृत्तीचें ॥३॥ परब्रह्म डोळां दावूं ऐसें म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥ करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा ॥५॥ नामा म्हणे देवा सांगूनियां कांहीं । नये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥६॥