भजनी मालिका

भजने

ऐसा माझा कोण आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥१॥ काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसा संत विरळा भेटे भाग्ययोगें । आथिला वैराग्यें सप्रेमळ ॥१॥ सर्वभावें करूनि सर्वभूतीं करुणा । जेथें मीतूंपणा ठाव नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हां आपुले घरीं चोखा होता ॥१॥ एकादशी व्रत करती दोघेजण । उपवास जाग्रण निशीमाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐसा हा देवानें थोर पवाडा केला। पूर्व अवतारी झाला हयग्रीव ॥ १॥ मग अंबऋषीसाठी पडियेला संकटीं । मच्छ झाला पोटीं समुद्राच्या ।। २ ।।

रचनाकार: संत जनाबाई

ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥ संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसिया बेगडी नका गोवूं आम्हांसी । अनुसरलों सेवेसी तुमचे नामचिंतनी ॥१॥ नाना मतांतरें त्यांचे अर्थ विपरीत । नेऊनियां घालित मुखीं काळाचे सर्व ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसिया संपत्ती आम्हां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥१॥ काम तो कामना भोगीतसे देवा । आलिंगणे हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसियांचे चरित्र जो आवडी आईके । तो या भक्ताबरोबरी तुके । भोगी वैकुंठींचीं निजसुखें । बोलिले मुखें श्रीविठठल ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसिये सांपडलों संदीं । सर्वदा व्दंव्दीं काळाचे ॥१॥ कैसी सुटका होईल आतां । न लक्षेचि सत्ता कर्मगती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा