भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हां आपुले घरीं चोखा होता

aisa samudav chandrabhage tirin | tevhan apule gharin chokha hota

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसा समुदाव चंद्रभागे तीरीं । तेव्हां आपुले घरीं चोखा होता ॥१॥ एकादशी व्रत करती दोघेजण । उपवास जाग्रण निशीमाजीं ॥२॥ तीन प्रहर जाहले उपवास जाग्रण । चोखामेळा म्हणे स्त्रीसी तेव्हां ॥३॥ तुझिया घरासी येऊं पारण्यासी । सांगून मजसी गेला देव ॥४॥ एका जनार्दनीं चोखा करी करुणा । तेव्हां नारायणा जाणवलें ॥५॥