भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा योगीराज देखिता अवचट

aisa yogiraj dekhita avachat

ऐसा योगीराज देखिता अवचट । उन्मनी लंपट रात्रंदिवस ॥१॥ सत्रावीची शिव टाकुनी राहिला । पहाण्यातील झाला सर्वाठायीं ॥२॥ असिपदीं आनंद प्रियरुप जाण । ध्यानाचें कारण जेथें नाहीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐसा योगीराणा । तयाचीया चरणा प्रणिपात ॥४॥