भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा येकवळा भक्तांचा । भोक्ता हरी वैकुंठींचा

aisa yekavala bhaktancha | bhokta hari vaikunthincha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा येकवळा भक्तांचा । भोक्ता हरी वैकुंठींचा । उतरोनी आळंकापुरी साचा । करी भक्तांचा उत्छाव ॥१॥ ऐसे जेवुनि धाले । हरिकरेंचि निवाले । मग सुखें रहिवासले । सकळै भक्त वैकुंठीं ॥२॥ देव म्हणती निवृत्तीसी । तुम्ही जावें त्र्यंबक सिखरासी । मग समाधी सरिसी । गंगोदकें करुनि घ्यावी ॥३॥ तंव सोपान म्हणे स्वामी । पूर्वीं बोलिले होतेति तुम्ही । कर्‍हे पठार संवत्सरे ग्रामीं । समाधे देऊं म्हणोनि ॥४॥ देव म्हणती संतासि पुसा । हा ज्ञानदेव असे सरिसा । हाहि दिव्यदेही आम्हांसरिसा । येईल तेथवरी ॥५॥ मुक्ताई म्हणे देवाधिदेवा । आम्ही करावी चरणसेवा । तुझेनि विचारेम जी केशवा । समाधीधन भक्तांसी ॥६॥ ऐसा करीती विचार । तंव पातला राजा इंद्र । भक्तीं केलें जयजयकार । देवें दुंदुभी वाजविल्या ॥७॥ संत सनकादिकीं स्तोत्रें । मुखीं आरंभिलीं पवित्रें । गाती हरीनाम चरित्रें । ऋषिगण सकळीक ॥८॥ धन्य आळंकापुरी ग्राम । जेथें प्रत्यक्ष पुरुषोत्तम । नामा नाचे हरिचे द्वारीं । ब्रह्मांद गरजे जयजयकारीं । निवृत्ति सोपान म्हणती हरी । आम्हां निरंतरी सांभाळीं ॥१०॥