भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा रोगाचा पवाडु । परमार्थ गोड तो जाहला कडु

aisa rogacha pavadu | paramartha god to jahala kadu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसा रोगाचा पवाडु । परमार्थ गोड तो जाहला कडु ॥१॥ कामक्रोधाचा उफाडा । शांति क्षमेचा दिला काढा ॥२॥ देतां नाममात्रा रसायन । प्रपंच रोग जाहला क्षीण ॥३॥ निधडा वैद्य जनार्दन । एका जनार्दन शरण ॥४॥