भजनी मालिका

भजने

उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥ ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहातातां परस्परें ॥१॥ सोडूं जों पाहती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उभयतां बैसोनि क्रोधें बोलती । कैशीं जाहलीं करणी एकमेक रडतीं ॥१॥ गोदोहन राहिलें दिवस आला दुपारी । धाउनी शेजारी येती पहाती नवलपरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उभयतांचे समाधान राजाईनें केलें । माझें तों घडलें उत्तम कार्य ॥१॥ मानसी तुम्ही नका करुं दु:ख । विठ्ठलाचें सुख मज जाहलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उभयतांनीं नमन केलें यथासांग । अर्थी पांडुरंग साह्म केला ॥१॥ कळवळिले संत वैष्णवांचे भार । आणिक योगेश्वर स्फुंदताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उभा भीमातिरीं कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढें ॥१॥ भक्तभाग्य थोर नव्हे कधीं प्राप्ती । जाणोनी श्रीपती गुज बोले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उभा भीमातीईं कट धरुनी करीं । वैकुंठीचा हई मौनरुप ॥१॥ ठेविनिया विटेसम पद दोन्हीं । उभा चक्रपाणी मौनरुपें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । पळे पाप महा सुटे कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । मुनिलागे बहु गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उभा विटेवरी । कट धरुनिया करीं । भीमा ती सामोरी । वहात आहे ॥१॥ जाऊं तया ठाया । आनंद तेणे काया । वैष्णवांचिया पायां ॥ लोटागंणी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उभा विटेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी बुंथी शोभे ॥१॥ विठोबा विठोबा नामाचा हा छंद । मन तें उद्धबोध जडी पायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उभा विटेवरी भक्तांचा कैवारी । भेटावया उभारी दोन्हीं बाह्या ॥१॥ गुण दोष त्याचे न पाहेची डोळां । भेटे वेळो-वेळां केशिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव