भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी

ubha ail thadi | tenen ghalun naye udi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥ पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥ दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥२॥ अळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥३॥