भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा कर ठेऊनी कटीं । अवलोकी दृष्टी पुंडलीकं

ubha kar theuni katin | avaloki drushti pundalikan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभा कर ठेऊनी कटीं । अवलोकी दृष्टी पुंडलीकं ॥१॥ न्या मज तेथवरी । या वारकारी सांगातें ॥२॥ पाहीन डोळे भरुनी हरी । दुजी उरी ठेविना ॥३॥ मीपणाचा वोस ठाव । पाहतां गांव पंढरी ॥४॥ वारकारी महाद्वारी । कान धरुनी करीं नाचती ॥५॥ शरण एका जनार्दनीं । ते संत पावन पतीत ॥६॥