भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा विटेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी बुंथी शोभे

ubha vitevari kat dharuniyan karin | pitambar sajiri bunthi shobhe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उभा विटेवरी कट धरुनियां करीं । पीतांबर साजिरी बुंथी शोभे ॥१॥ विठोबा विठोबा नामाचा हा छंद । मन तें उद्धबोध जडी पायीं ॥२॥ त्री अक्षर नाम जप हा परम । तो मंगळधाम विठ्ठल माझा ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल कानडा । देखिला उघडा विटेवरी ॥४॥