भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभा भीमातिरीं कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढें

ubha bhimatirin kar katavari | rahe nirantari bhaktan-pudhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उभा भीमातिरीं कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढें ॥१॥ भक्तभाग्य थोर नव्हे कधीं प्राप्ती । जाणोनी श्रीपती गुज बोले ॥२॥ गणिका गजेंद्र उद्धव नारद । आपण गोविंद मिळोनियां ॥३॥ समुद्रमंथनीं उभा करोनियां । लागतसे पायां नामा ह्मणे ॥४॥