भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

उपायाच्या करितां श्रेणी । परि जेथ कोणी न पवेचि ॥१॥ तया पावविलों ठायां । संतीं करुनियां निज कृपा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥ ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उमटलीं विष्णूपदें । गयावर्जनीं जे प्रसिध्दें ॥१॥ नारद क्षेत्रीं पंढरपुरीं । अदभुत पदांची त्या थोरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उष्में न तपेचि सुधाकर । सीतें न पीडे वैश्वानर ॥१॥ तेंवि हरिभक्तांतें हरी । नेदी बुडों भवसागरीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक गांऊ आम्ही विठोबाचें नाम । सकळहि धाम मंगळाचें ॥१॥ इतर साधनें फळ काम देती । पुनरपी आणिती गर्भवसा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक जोडी बहुतें खाती । भाग्यवंत म्हणती जन त्यासी ॥१॥ परि त्या आणिक साहित्यासी । नव्हे तैसी जोडी याची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक देशी आम्ही एकट एकले । आशेचे बांधले जन्मोजन्मीं ॥१॥ म्हणउनी इच्छुं तुमचा आश्रय । पाहविसे पाय वाटताती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक ना दुसरें वो नव्हते मजपांशी । मी मज नोळखतां आप आपणासी । होति ये निर्जनी वो निराभास देसीं । नेणों कोणें आणियेलें कर्मभूमिसी ॥१॥ तैंसपासूनियां विसरलें निजसुखा । वाटे जीव माझाचि परि मज वो पारिखा । देखोनि आपपर पात्र जालें बहु दु:खा । सांगो कोणापासि सये जाला ऐसा वाखा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एक भूवैकुंठ एक शिवपीठ । महिमा वरिष्ठ दोहींचा ॥१॥ तेथें पेरिलें नुगवे शेतीं । अस्थी विरती तेथें उदकीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकचि अक्षर वाचेसि येतां । पुढें वाढवितां विस्तारें ॥१॥ कां हे चेष्टविली वाणी । माझी चक्रपाणी मी नेणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

एकचि नाम विठोबाचें । उच्चारितां वाचे उणें काय ॥१॥ रिध्दी सिध्दी लोटांगणीं । येती धांवोनि चोजवीत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा