भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एकाहुनी आगळे । ओंविले संत कंठमाळे

ek ekahuni agale | onvile sant kanthamale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एक एकाहुनी आगळे । ओंविले संत कंठमाळे ॥१॥ तेणें विराजलेती हरि । प्रभा फांकली दिगांतवरी ॥२॥ संत चरित्रें सुंदरे । परिधान केलीं दिव्यांबरें ॥३॥ संतनामें निळा म्हणे । मुगुट कुंडलें करकंकणें ॥४॥