भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

यशोदेसी गौळणी सांगती गार्‍हाणे । नट नाटक कपटी सांभाळ आपुले तान्हें । किती खोडी याच्या सांगु तुजकारणें ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

या देहा अमंगळा । पासुनी आत्मा वेगळा । ऐसा ज्ञानाचा डोळा । प्रत्यक्ष दिसे ॥१॥ ज्ञान म्हणजे शुद्ध सत्वगुण । जेथें द्वैत प्रकृतीचें अधिष्ठान । जी पासाव सव्वीस लक्षणें । बोलिलें षोढशाध्यायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसीं ॥१॥ सुख जोडलें पुंडलिकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या पोटाकारणें न करावें तें करिती । वेद ते विकिती थोर याती ॥१॥ नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण । ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचें मुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

या हो या चला जाऊं कीर्तना । आनंद तेणें मना नाचती वैष्णव ॥१॥ राम कृष्ण हरि वासुदेवा । गातती प्रेमभाव आवडी आदरें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

याचिया छंदा जें पैं लागलें । निर्मूलन केलें त्यांचे येणें ॥१॥ बापुडा नारदु लाविला लंगोटी । हिंडे दाटोदाटि त्रैलोक्यांत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

याचिये संगतीं दु:खाची विश्रांती । संसार वाताहाती होत असे ॥१॥ आम्ही प्रंपचीक करावा प्रंपच । हा तो निष्प्रपंच होउनी असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

यातीकुळ कांहीं नाणी तो मानसीं । धांवें त्यांचे पाठीसी लागवेंगें ॥१॥ आपुलें म्हणविल्या न देखे पारिखें । रक्षी त्या कौर्तुकें आपुले काजा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

याहांकी बात नहीं मेरी आवछे । तोरे चरण कमल मैं द्यावछे ॥१॥ सुंदरतुन नंदनंदन लालछे । गळां शोभे वैजंयती मालछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥ विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥ सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ॥ वैराग्य जातें मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें ॥येई ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥ मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥ दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥ शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥

रचनाकार: संत एकनाथ