भजनी मालिका
← भजनांकडे परत

येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं

yeuni naradeha gamavilen ayushya | nahin hrushikesh smarala manin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥ मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥ नाहीं तें ऐकलें कीर्तन संतांचे । कर्ण बधिर साचें जाहलें देवा ॥३॥ करें नाही केला दानधर्म कांहीं । ऐसा अपराधी पाहीं जाहलों देवा ॥४॥ चरणन चालती तीर्थयात्रेप्रती । ऐसा आत्मघाती जाहलों देवा ॥५॥ एका जनार्दनीं संसारांचा छंद । नाहीं तो गोविंद आठविला ॥६॥