भजनी मालिका
← भजनांकडे परत

या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा

ya pandhariche sukh pahatan dolan | ubha to jivhala yogiyancha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
या पंढरीचे सुख पाहतां डोळां । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥ म्हणोनियां मन वेधलें चरणीं । आणिक त्यागुनी बुडी दिली ॥२॥ जनार्दनाचा एका धांवे लोटांगणीं । करी वोवाळणी शरीराची ॥३॥