भजनी मालिका

भजने

उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं ॥१॥ बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळकें ।चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदयीं उदय होतां कृपादृष्टी । स्वयें जगजेठी सेवा करी ॥१॥ सडा समार्जन स्वयें करी हरि । उदक तें भरी गंध घासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उदयो अस्तु मावळलें भान । कर्माकर्मीं सहज समाधान ॥१॥ कर्म तें गेलें करणें हारपलें । सहजीं पारुषले धर्माधर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

उदर भरावया घेऊनियां सोंग । घरोघरीं बोंब उपदेशाची ॥१॥ आपणा कळेना कळेना लोकां सांगे ज्ञान । धरूनियां ध्यान बक जैसा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदार ऐसा न दिसेचि दृष्टि । पाहतांहि सृष्टी मज आतां ॥१॥ जयाचीया वचनें जीवा जीवपण । नुमसेचि शीवपण शिवा अंगीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥१॥ सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदार कृपाळ सांगशील जना । तरी कां रावणा मारियेलें ॥१॥ नित्यानित्य पूजा सिरकमळीं करी । तेणें तुझें हरी काय केलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेले । नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥१॥

रचनाकार: संत कान्होबा

उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥ सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसें म्हणतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदार चक्रवर्ती लक्ष्मीचा पती । तरी कां काकुळती चित्तीं वाहासी ॥१॥ आम्हां दुर्बंळाचें ठेवणें कां ठेविलें । दिवाळें निघाळें काय तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उदार तूं हरी ऐसी कीर्ती चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥ तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रम्हांडा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उदार विश्वाचा दीपकु तेजाचा । प्रकाशु कृपेचा दावियेला ॥१॥ हारपले विश्व विश्वभरपणे । दाविलें जनार्दनें स्वयमेव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ