भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत

udar tumhi sant | mayabap krupavant

रचनाकार: संत सेना · अभंग
उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥१॥ केवढा केला उपकार। काय वाणूं मी पामर ॥२॥ जडजीवा उद्धार केला। मार्ग सुपंथ दाविला ॥३॥ सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ॥४॥