भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं

uday suryacha jala | milala gaulanicha mela | dhauni sakalan | aliya anganin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदय सुर्याचा जाला । मिळाला गौळणीचा मेळा । धाउनी सकळां । आलीया अंगणीं ॥१॥ बोलती आणि संक्रोधें । थोर पीडेलें बाळकें ।चोरी करुनियां देखे । आला पळोनि ॥२॥ आमुचीं फोडिलीं भाजनें । दहीं दुध खादलें येणें । एका जनार्दनी तान्हें । यशोदे तुझें ॥३॥