भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची

udar bhakta udar bhakta | trailokin mat jayachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥ केला भगवदगीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥ बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवातें उपदेशिती ॥३॥ एका जनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥