भजनी मालिका

भजने

स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया ॥१॥ पंढरीचें सुख देखोनी नयनी। करिती विनवणी जोडुनी हात ॥२॥

रचनाकार: संत सेना

स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या ॥१॥ साव्धान हो पाहे बा पंढरी । धरीं तु अंतईं संतसंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वहिताकारणें संगती साधुची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचें गुज होतें कांहीं ॥१॥ करा हरीभजन तराल भवसागर उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत सेना

स्वानंदांत पडोनियां जाती । न संडी वासना चघळित हस्ती ॥१॥ तैसें माझें मन मुरारी । वासना धांवे विषयावरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळां । तंव चराचर अवघें श्रीदत्तची लीला ॥१॥ विस्मयो दाटला आतां पाहुं मी कैसें । देखता देखणें अवघे दत्तचि दिसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वानंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आलिंगावें ॥१॥ देव म्हणे भले आठवलें तुज । ते हे संधी मज कळली असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वामी तेथे आले प्रत्यक्ष हो पूर्ण हात फिरवीती सर्व बाळावरी ॥१॥ वरदहस्त जेव्हा लागला बाळासी जीवंत हो जाहला तात्काळाची ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

स्वामीचिया सत्ता । आधीं वर्में येती हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥ कर्री कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्वामीदर्शनें पतिता आनंद । देवदर्शनें संतोषें भक्तवृंद ॥१॥ यापरी आनंद सदा मनीं हरि । वांचूनी छंद दुजा नाहीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

स्वामीसी तो पुरे एक भाव गांठीं । वाउगा श्रम नेहटी वायां जाय ॥१॥ भावासाठीं देव अंकित अंकिला । राहिला उगला बळीचे द्वारीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ