भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचें गुज होतें कांहीं

svahitakaranen sangatase tuj | antarichen guj hoten kanhin

रचनाकार: संत सेना · अभंग
स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचें गुज होतें कांहीं ॥१॥ करा हरीभजन तराल भवसागर उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥ कृपा नारायणे केली मजवरी । तुम्हालागीं हरी विसंबेना ॥३॥ सेना सांगूनियां जातो वैकुंठासी। तिथि ते द्वादशी श्रावणमास ॥४॥