भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामीचिया सत्ता । आधीं वर्में येती हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा

svamichiya satta | adhin varmen yeti hata | pudhati visheshata | labhen labh agala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्में येती हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥ कर्री कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥ मन मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरी दिल्या उमटोनि ॥२॥ पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥