भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया

svargiche amar magatati deva| santachi seva karavaya

रचनाकार: संत सेना · अभंग
स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया ॥१॥ पंढरीचें सुख देखोनी नयनी। करिती विनवणी जोडुनी हात ॥२॥ चारी मुक्ति तेथें हिंडती दीनरूप । येऊं नेदी समीप कोणी तया ॥३॥ धिक्कारुनी तया घालिती बाहेरी। मागुती पायावरी लोळताती ॥४॥ वैष्णव शरण येती काकुळती। आमुची ती गती काय सांगा ॥५॥ या सुखाचा थेंबुटा नमी ब्रह्मादीकां । तेथें देखा सरता झाला॥६॥