भजनी मालिका

भजने

साती बारी दोन्ही आपणचि होऊनि । सुरतरु माझारी वोळगे ॥ तळीं त्रिभंगी मांडूनि ठाण घेऊनि मेघाचें मान । विजु एकी वेढुन बरवे गर्जतुगे माये ॥१॥

साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥ अर्पियले स्नान झालें समाधान । मनाचें उन्मन होऊनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥ या साहेबाचें झालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सात्विक हें वैराग्य अर्थाचें हें मूल । आशा हें केवळ अनर्थ जाणा ॥१॥ अंतरापासोनी नसतां विवेक । निभ्रांताचे टक आशेवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सात्विकाभरणें रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊं लागे ॥१॥ कांपे तो थरारी स्वरुप देखे नेत्री । अश्रु त्या भीतरीं वाहताती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥ लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परिमित ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधन कासया श्रम ते करावे । निवृत्तिनाम गावें सदोदित ॥१॥ तीर्थयात्रा कांहीं नाम मुखें गाईं । निवृत्तिनामें डोहीं बुडी दे का ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साधन कांहीं नेणें मी अबला । श्याम हें रुप बैसलेंसे डोळा । लोपली चंद्रसुर्याची कळा । तो राम माझा जीवींचा । जिव्हाळा ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

साधन तें सार पंढरीचीवारी । आन तुं न करी सायासाचें ॥१॥ वेद तो घोकितां चढे अभिमान नाडेल तेणें जाण साधन तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

साधन साधितां होताती आपदा । म्हणोनि गोविंदा स्मरे कां रे ॥१॥ कृष्णकथा सार सांगे कां सधर । तुटेल येरझार जन्ममरणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥ अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ