भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधक बाधक न बाधी जनक

sadhak badhak na badhi janak

साधक बाधक न बाधी जनक । सर्व हरि एक आम्हां असे ॥ १ ॥ हरिविण नाहीं हरिविण नाहीं । हरि हेंचि पाही एकरूप ॥ २ ॥ हरिमाझा जन हरि माझें धन । हरि हा निर्गुण सर्वांठायीं ॥ ३ ॥ निवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला । निमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥ ४ ॥