भजनी मालिका
← भजनांकडे परत

साती वारी दोन्ही आपणचि होउनि

sati vari donhi apanachi houni

साती वारी दोन्ही आपणचि होउनि । सुरतरुमाझारीं ओळगे ॥ तळीं त्रिभंगी मांडूनि ठाण घेऊनि मेघाचें मान । विजु एकी वेढून बरवे गर्जतु गे माये ॥१॥ नवलावो गे माये न्याहाळितां कैसे मनाचे नयन उमळताती । तीही एक दृष्टि जिव्हा लाभती तरी सुलभु देखतां बोलती गे माये ॥धृ॥ पाहो याचे पाय । शंभूचिया माथां माये । सासिन्नली चंद्रदाहे गंगेतें ॥तेथ असुरांचीं शिरें । येथ सकळ शरीरें । तोडराचेनि बडिवारें गर्जतु गे माये ॥२॥ तेज सांवळें । रूप लाधलें परिमळें । अनंगाचेनि सळें । कासें कासियेला ॥तो पालऊ पांढर गळें । होतुका जगाचे डोळे । दुरुनियां सुनिळें रोविले गे माये ॥३॥ उपनिषदाचा गाभा । माजीं सौदर्याची शोभा । मांडिला दो खांबा । तैसा दिसे देखा । वेगळालिया कुंभस्थळा । परी हातु सरळा । पालटु बांधिला माळा । मेखळामिसें गे माये ॥४॥ भलतेउती वाहे न वाहे नदी । जेवीं स्थिरावे अगाधीं । तैसी पुंजाळता हे मांदी । दोंदी वेदांची ॥वरिलिया वक्षस्थळा । नुपुरे स्थानीचा डोळा । मागून निघे कमळा । नव्हे रोमराजी ॥५॥ लावण्य उदधी वेळा । तेंचि पैं वैजयंती माळा । वरी शोभतसे सोहळा । साकारवेचा । म्हणो प्रेम सुकाळा । जग मेळवितु गे माये ॥६॥ भोंवतीं तारांगणें पुंजु । माजीं अचळ सुरिजु । आला वक्षस्थळा उजु । कैसा दिसे देखा ॥जेवणेंनि अंगें । उभऊनि श्रीकरायोगें । योगनादातटीं रंगे । नभु दुमदुमतवो माये ॥७॥ इंद्रधनुष्य काढिलें । तया तळीं बहुडलें । तेंचि कुरळी वेढिलें । समाधिसुख देखा ॥अधरीचा गुणु । श्रुतीगर्भी समवर्णु । दोही खरीं गोडी वेणु । जग निववीतु वो माये ॥८॥ या वेधितां कांहींच नुरे । रूपा आलें हेंचि खरें । वरीं दावितां हें माजिरें । गोपवेशाचें ॥तमावरी हातियेरे । रविकाज काईये रे । तैसा रखुमादेविवरें । वीरें घेतलें गे माये ॥९॥