भजनी मालिका

भजने

संसारींच्या आह्या आहाळलों भारी । निवावी गा श्रीहरि अमृतदृष्टी ॥१॥ मी अनाथ अपराधी दुर्बळ दुराचारी । कृपाळू बा हरी तारीं मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहज तो चेंडु समान फळी । झेलुं जाणेतो खेळियां बळी ॥१॥ झेला रे भाइनों झेलारे सदगुरुवचनें झेला रे ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं आठवण न धरिती ॥१॥ हरी व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथें । मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥ उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सहज सहज ऐशा करिताती गोष्टी । परि सहजाची भेटी विरळा जाणें ॥१॥ सहजाच्या आवडी विद्या अविद्या तोडी । जाणीव नेणीवेची राहुं नेदी बेडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सहज सुखासनीं अनुसुयानंदन । पाहतां हें ध्यान वृत्ती निवे ॥१॥ बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सहजचि घरींहूनियां यावें । विठठला पहावें रुक्मिणी ॥१॥ न लभेचि जो कां ब्रम्हादिकां । तो या लोकां दाखविला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सहजचि तुमचीं वंदिली पाऊलें । तवं मी माझें हें हिरोनि घेतलें ॥१॥ आतां कोण दर्शना येईल सांगा । स्वभाव कळल्यावरी तुमचा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सहसमुदायेंसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां ॥१॥ उठले विष्णव आणि ह्रषिकेशी । आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्त्र मुखांचा वर्णितां भागला । तें सुख तुजला प्राप्त कैचें ॥१॥ संतांचे संगती सुख तें अपार । नाहीं पारावार सुखा भंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ