भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहजची पूजा पुरे । श्रम वाउगांची उरे

sahajachi puja pure | shram vauganchi ure

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सहजची पूजा पुरे । श्रम वाउगांची उरे ॥१॥ आठवीन वेळोवेळां । केशवा माधव गोपाळा ॥२॥ मंत्रस्नान विभूती । मुखीं राम जपविती ॥३॥ नाहीं आणीक काम । वाचे म्हणे रामनाम ॥४॥ एका जनार्दनीं बरवी । पूजा करीन देवदेवीं ॥५॥