भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें

sahaj lila mi sakshi yacha | naye vanchun vacha aisen jalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥ उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥ तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन॥२॥ तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥३॥