भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्त्र मुखांचा वर्णितां भागला । तें सुख तुजला प्राप्त कैचें

sahastra mukhancha varnitan bhagala | ten sukh tujala prapta kaichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सहस्त्र मुखांचा वर्णितां भागला । तें सुख तुजला प्राप्त कैचें ॥१॥ संतांचे संगती सुख तें अपार । नाहीं पारावार सुखा भंग ॥२॥ एका जनार्दनीं सुखाचीच राशी । उभा हृषिकेशी विटेवरी ॥३॥